येऊ कशी तशी मी ..... डॉक्टरकडे
- डॉ. वर्षा चिपळूणकर- ओक (स्त्रीरोगतज्ज्ञ.)
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप परत जमू लागला. काल त्यांच्या गप्पा सहज कानावर पडल्या. एक आजी त्यांच्या मैत्रीणिला सांगत होत्या, ” माझा मुलगा मला दर वर्षी माझी वार्षिक आरोग्य तपासणी (Annual Health Checkup) करायला घेऊन जातो. एकदा ते झाले की निर्धास्त वाटते आणि काही कमी जास्त असेलच तर लगेच उपचार घेता येतात. तू करतेस का दर वर्षी चेकअप?”
दुसर्या आजी म्हणाल्या, ” मी अगदी ठणठणीत आहे. काहीच होत नसताना मी कशाला डॉक्टरकडे जाऊ?”. आपल्या समाजात अजूनही “screening test” ही संकल्पना रुजलेली नाही. एखाद्या रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वी त्या रोगाचे किंवा रोग होण्याच्या शक्यतेचे निदान करण्यासाठी स्क्रीनिंग तपासण्या करतात. या चाचण्यांमुळे वेळीच उपाय करून रोगाला प्रतिबंध करता येतो किंवा रोग बळावण्याआधी रोखता येतो. आपण आज स्त्रियांमधील अशा चाचण्यांची माहिती घेऊ. वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या चाचण्या करणे गरजेचे असते.

- विवाहपूर्व तपासण्या- आपला जोडीदार निरोगी असल्याची खातरजमा करण्यासाठी आणि जोडीदाराला कुठला रोग संक्रमित होऊ नये यासाठी या तपासण्या करतात. हिमोग्लोबिन, एचआयव्ही, हिपेटायटिस बी आणि सी या रक्तचाचण्या स्त्री- पुरुष दोघांनी कराव्यात. या सर्व जंतुसंसर्गांचे शरीरसंबंधादरम्यान संक्रमण होऊ शकते. स्त्रियांनी रुबेला ही चाचणी करणे उपयुक्त ठरते. रुबेला म्हणजे जर्मन गोवराची स्त्रीला गर्भावस्थेत लागण झाल्यास बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकते. या चाचणी द्वारे या संसर्गाविरुद्ध असलेली रोगप्रतिकारशक्ती तपासण्यात येते व ती नसल्यास रुबेला ची लस देऊन प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते. कुटुंबातील सदस्यांना काही विशिष्ट अनुवांशिक किंवा जनुकीय आजार असेल तर त्या संदर्भातील तपासण्या पण कराव्यात. जसे की thalassemia किंवा sickle cell anaemia सारख्या रक्तातील आजाराचे निदान लग्नापूर्वीच केले तर उत्तम.
- गर्भधारणापूर्व तपासण्या- साधारणपणे विवाहपूर्व तपासण्यांची जी यादी आहे , त्या सर्व तपासण्या गर्भधारणेपूर्वी झालेल्या असणे आवश्यक आहे. त्याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण व थायरॉईड संप्रेरकाची पातळी तपासावी. मधुमेह असल्यास किंवा थायरॉइडचे प्रमाण कमी जास्त असल्यास गर्भात दोष किंवा व्यंग निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच उपचार सुरू करणे इष्ट ठरते. आता काही नियमित तपासण्या व चाळिशीनंतरच्या तपासण्यांची माहिती आपण पुढील भागात घेऊ.