स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि हॉर्मोन्स
- डॉ. वर्षा चिपळूणकर- ओक (स्त्रीरोगतज्ज्ञ.)
आज अचानक हा विषय सुचण्याचे कारण म्हणजे १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ (World Mental health Day) साजरा केला जातो. त्या निमित्ताने आपण स्त्रियांमध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घडणणारे नैसर्गिक हॉर्मोनल बदल आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी थोडे बोलूया.
पौगंडावस्थेपासून ते अगदी रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हॉर्मोन्स चा , म्हणजे संप्रेरकांचा प्रभाव असतो. आणि या हॉर्मोन्स ची पातळी जेव्हा जेव्हा कमी जास्त होते तेव्हा मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. आपण सध्या सोयीसाठी या हॉर्मोन्स ना Factor F असे नाव देऊ.
१. पौगंडावस्था (Adolescence)- जेव्हा मुलींची पाळी नव्याने सुरु होते तेव्हा अर्थातच आपल्या Factor F चा शरीरात नव्यानेच खेळ सुरू होतो. त्यामुळे शारीरिक बदलांबरोबरच फार मोठे मानसिक बदल होतात. नवीन आवडी निर्माण होणे, सर्व च गोष्टी स्वतंत्रपणे कराव्या असे वाटणे, स्वतःच्या शारिरीक सौंदर्याची जास्त काळजी घेणे, मुलांबद्दल आकर्षण वाटणे, पटकन राग येणे हे या अवस्थेतील नॉर्मल बदल आहेत. पण कधीकधी हे बदल अतिरिक्त प्रमाणात होऊ शकतात. आणि हे हळुवारपणे समजून घेणारी एखादी मोठी व्यक्ती आसपास नसेल तर या मुलींची घुसमट होऊ शकते. या मुली अजून पुरेशा प्रगल्भ नसल्यामुळे कधीकधी चुकीच्या मार्गाने उत्तर शोधतात किंवा आत्मविश्वास गमावून बसतात किंवा नैराश्याच्या शिकार देखील होऊ शकतात.
२. पाळी येण्याच्या आधीचा काळ (Premenstrual period) – दर महिन्यात पाळी येण्याच्या अगोदर २ ते ७ दिवस काही स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक बदल जाणवतात. मानसिक बदलांमध्ये मुख्यतः चिडचिड वाढणे किंवा नकारात्मकता वाढणे याचा समावेश असतो. हे बदल, पाळी येण्यापूर्वी आपल्या शरीरातील Factor F कमी झाल्यामुळे होतात. पण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असून पाळी आल्यावर आपोआपच छान वाटू लागते. हे बदल प्रमाणाबाहेर होत असल्यास त्यासाठी विविध वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.
३. गर्भावस्था व प्रसूतीनंतरचा काळ- गर्भावस्थेत शरीरात Factor F ची पातळी खूपच वाढलेली असते. तसेच फार मोठे शारीरिक बदल होत असतात. येणाऱ्या बाळाची चाहूल सुखावणारी असली तरी मनात एक भीती देखील असते. बर्याचदा प्रसूतीच्या प्रक्रियेबद्दल देखील भीती वाटू शकते. (विशेषतः आपल्या चित्रपटांमध्ये जशा पद्धतीने प्रसूतीच्या वेळी किंचाळणार्या आणि बेशुद्ध होणार्या बायका दाखवतात त्याने ही भीती आणखीनच वाढते😆). या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून स्त्री अधिक संवेदनशील होते किंवा चिडचिड करायला लागते. जर मुळात स्त्री ला काही मानसिक आजार असेल तर तो गरोदरपणात बळावू शकतो. गरोदर अवस्थेपेक्षा देखील जास्त मानसिक बदल हे प्रसूतीनंतरच्या काळात होतात. कारण अर्थातच आपल्या factor F ची प्रचंड वाढलेली पातळी डिलिव्हरी नंतर अचानक कमी होते. त्याचबरोबर बाळाची मोठी जबाबदारी असल्याने त्याचा ताण येतो. डिलिव्हरीच्या आधी कितीही मानसिक तयारी केली तरी बाळ झाल्यानंतरचा अनुभव हा वेगळाच असतो. जवळपास ५०% स्त्रियांना डिलिव्हरी नंतर पोस्टपार्टम ब्ल्यूज् (postpartum blues) चा अनुभव येतो. यामध्ये सतत मूड बदलणे, उगाच रडू येणे, चिडचिड होणे, शांत झोप न लागणे, उगाच अती काळजी वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे प्रसूतीनंतर ३-४ दिवसांनी सुरु होऊन जास्तीत जास्त १०-१५ दिवसांपर्यंत राहतात. सहसा यासाठी कुठल्या उपचारांची गरज पडत नाही. मात्र ही लक्षणे पुढेही चालूच राहिली किंवा खूप तीव्र असली, तर त्यालाच नैराश्य (postpartum depression) असे म्हणतात. यामध्ये खूप उदास वाटणे, बाळाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होणे याचीही भर पडते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जवळपास १०-१५% स्त्रिया या postpartum depression चा त्रास सहन करतात. पण हा एक आजार आहे आणि त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे हेच माहिती नसते.
४. रजोनिवृत्ती- या काळात पाळी हळूहळू बंद होते. म्हणजेच आपल्या शरीरात Factor F तयार होणेच कमी किंवा बंद होते. साधारण पन्नाशीच्या दरम्यान ही प्रक्रिया होते. याच काळात आयुष्यातही बरेच बदल होत असतात. मुले शिक्षण-व्यवसायानिमित्त किंवा लग्न होऊन आपल्यापासून लांब जातात. किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती सोडून जातात किंवा आजारी असतात. या काळात सतत मूड बदलणे, पटकन राग येणे, उदास वाटणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, सतत थकवा जाणवणे अशा तक्रारी किमान ५०% स्त्रियांना असतात. आणि यापैकी १०-१५ % स्त्रिया नैराश्याच्या (clinical depression) शिकार होतात.

आता तुम्ही म्हणाल की ही तर नुसती लक्षणांची यादी झाली. पण यावर उपाय काय??
- सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक समस्या ही पण एक महत्त्वाची समस्या आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार असतात हे मान्य करा. Acceptance is the first step towards solving a problem.
- आपल्या मध्ये होणाऱ्या मानसिक बदलांबद्दल घरातील इतर माणसांशीही बोला. कारण नवर्याला किंवा मुलांना याबद्दल काही कळतच नसल्यामुळे ते तुम्हाला काहीच मदत करू शकत नाहीत. आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला कोणी समजून घेत नाही. बर्याचशा सौम्य स्वरूपाच्या मानसिक समस्या या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा लेख घरातील इतरांनाही वाचायला द्या.
- आपल्या स्त्रीरोगतज्ञाशी याबद्दल बोला. ‘त्यात काय सांगायचे’ असा विचार करू नका. तुम्ही अडचण सांगितली तर नक्कीच उपचार करता येतील.
- गरज पडल्यास समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. आणि ती वेळीच घ्या. मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर किंवा त्यांच्या औषधांनी फक्त झोप येते किंवा डोके बधीर होते हे समज पूर्णपणे चुकीचे आहेत. कुठलाही मानसिक आजार हा मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडल्यामुळे (केमिकल लोचा) होतो. आणि औषधांमुळे हे संतुलन राखण्यास मदत होते.
- नियमित व्यायाम करा. आता तुम्ही म्हणाल मानसिक आजार आणि व्यायामाचा काय संबंध? तर व्यायामाने जशी शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते तशीच व्यायाम केल्यामुळे शरीरात एन्डॉर्फिन किंवा सिरोटोनिन सारखी काही केमिकल्स वाढतात. आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. हे शास्त्रीय द्रुष्टीने सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नियमित आणि भरपूर व्यायाम करा.
- संतुलित आहार- व्यायामाप्रमाणेच योग्य आहार घेतल्याने देखील शरीरातील पोषकद्रव्यांचे ( nutrients and micronutrients) संतुलन राखले जाते.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला शिका. कुणाचीही मुलगी, पत्नी, आई असण्याअगोदर तुमचे असे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि तुमच्या स्वतःच्या काही गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. हा वेळच मानसिक सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे.
#mentalhealthawareness
# Women’s health
# Hormones