Dr Varsha Oak

PAP smear तपासणी

आता 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आजकाल हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये किंवा pathology laboratories मध्ये स्त्रियांची आरोग्यविषयक तपासणी करण्याची मोहीमदेखील या दरम्यान राबवली जाते. पण काही स्त्रियांचे असे म्हणणे असते, की आम्हाला काही आजार नाही, तर आम्ही कुठल्या तपासण्या कशाला कराव्यात?
Screening test या एका शब्दात या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. एखाद्या रोगाचे लक्षण दिसण्यापूर्वी त्या रोगाचे किंवा रोग होण्याच्या शक्यतेचे निदान करण्यासाठी स्क्रिनिंग तपासण्या करतात. या चाचण्यामुळे वेळीच उपाय करून रोगाला प्रतिबंध करता येतो किंवा रोग बळावण्या आधी रोखता येतो. अशीच एक महत्त्वाची screening test म्हणजे PAP smear test.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची ही screening test आहे. कर्करोग म्हणले की सर्वांच्याच मनात भीती असतें. त्यात गर्भाशयमुखाचा कर्करोग ( Cervical cancer) हा भारतात खूपच प्रमाणात आढळतो. दुर्दैवाने सर्व प्रकारच्या कर्करोगांसाठी screening चाचण्या उपलब्ध नाहीत. पण या cervical cancer साठी अशी चाचणी उपलब्ध आहे. आणि हा कर्करोग प्रत्यक्षात निर्माण होण्याआधी जे काही बदल त्या भागात होत असतात, तेसुद्धा या चाचणीतून समजतात. त्यामुळे कर्करोग होण्यापूर्वीच, म्हणजे precancerous बदल झाल्यावरच, त्यावर उपचार करता येऊ शकतात. या PAP test मध्ये तुमचे डॉक्टर गर्भाशय मुखाच्या जवळील पाणी घेऊन ते तपासणीसाठी पाठवतात. आणि त्यामुळे तेथील पेशी नॉर्मल आहेत की नाहीत, हे लगेच समजते. लैंगिक संबधांत सक्रिय असलेल्या ( sexually active) २५ वर्षांवरील वय असलेल्या सर्व स्त्रियांनी ही तपासणी करावी. आणि एकदा नॉर्मल आली, तर दर 3 वर्षांनी करत राहावी.

आधुनिक काळात याप्रमाणेच करण्याची एक HPV test अशी तपासणीपण आहे. त्यामध्ये या भागातील पाणी घेऊन ते एका विशिष्ट virus साठी तपासले जाते. त्या virus चा आणि cervical cancer होण्याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. PAP आणि HPV test एकत्र केली तर आणखीनच अचूक निदान होते. आणि मग ही तपासणी दर 5 वर्षांनी केली तरी चालते. आपल्या समाजात बऱ्याच स्त्रियांना या तपासणीबद्दल माहितीच नाहिये. आणि ज्यांना माहिती आहे,त्यांना ही तपासणी करण्याची भीती किंवा लाज वाटते. परंतु या भीतीपेक्षा कर्करोग झाला, तर काय होईल ही भीती जास्त मोठी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल जागरूक राहणे आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींना प्राधान्य देणे हे महत्त्वाचे आहे.
Scroll to Top